प्रभा पुरोहित - लेख सूची

झुंडशाही – एक गहन समस्या

अलिकडे झुंडीच्या हिंसेने आपल्या देशात कहर मांडला आहे आणि हिंसेला विरोध करणारा आवाज क्षीण झाला आहे. आज हिंसेच्या विरोधात समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणाले होते, “वैराने वैर संपत नाही आणि हिंसेने हिंसा संपत नाही.” महात्मा गांधींच्या जीवनाचे तर अहिंसा हे सार होते. ‘Eye for an eye will make …

किर्लोस्कर मासिक, अंधश्रद्धा निर्मूलनाची एक सामाजिक चळवळ

महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली पहिला उद्योगसमहू काढला. ह्या किर्लोस्कर उद्योगसमहूाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. १९२० ऑगस्टला त्याचा पहिला अंक निघाला.  आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रूढी बोकाळल्या आहेत त्यांचे स्वरूप उघडे करून त्यांना आळा घालण्याचे प्रयत्न हे मासिक करील असे आश्वासन शंकरराव …

डॉ. दाभोलकर आणि अधंश्रद्धा निर्मूलनाचे भावनिक अंतरंग

अंधश्रद्धांची मुळे कुठपर्यंत गेली आहेत याचा शोध घेऊन ती मुळापासून उखडून टाकली तरच अंधश्रद्धांचे खरे निर्मूलन होईल. ह्या मुळांचा शोध आपल्याला धर्मग्रंथांपर्यंत आणि धार्मिक संस्कृतीपर्यंत नेतो. या धार्मिक पायावरच घाव घालून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एक बुद्धिप्रामाण्यवादी चळवळ सुरू करावी असा सल्ला शहाजोगपणे बरेचजण देतात. त्यांचे हे विश्लेषण बरोबर आहे. परंतु त्यांनी सुचविलेला उपाय अव्यवहारी आणि …

आगरकर

१९ व्या शतकातील बुद्धिवादी विचार आणि लेखन सतत व प्रभावीपणे करणारे गोपाळ गणेश आगरकर हे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. केसरीतून ७ वर्षे व ‘सुधारक’मधून ७ वर्षे असा एकूण १४ वर्षे त्यांनी रूढी, आचार, विचार, पोषाख, वैवाहिक जीवन, शिक्षण, व्यापार इत्यादि ऐहिक जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगावर परखड, सुधारकी लिखाणाचा भडिमार केला. त्याला कुत्सितपणाचा स्पर्श नव्हता. अधिक धारदार …

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची चळवळ

विवेकवादाच्या चळवळीत शासन आणि न्यायव्यवस्था ह्यांचा काय सहभाग असतो, समाजसुधारक आणि सामाजिक संस्था ह्यांना काय तडजोडी करायला लागतात आणि विरोधकांची त्यामध्ये काय भूमिका असते असा सर्व अंगाने अंनिसच्या कायदाविषयक चळवळीचा अभ्यास केला तर ते उद्बोधक ठरेल. अंनिस १९९० पासून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. ह्यात शासनाची चालढकल अशी राहिली. एका राजवटीत १९९५ मध्ये …

महाराष्ट्र अंधश्रद्धा-निर्मूलन समिती

राष्ट्रसेवादल, बाबा आढाव ह्यांची ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळ आणि अन्य परिवर्तनवादी चळवळीतील सहभागाची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांना बी. प्रेमानंदांबरोबर ‘विज्ञान जथा’ मध्ये काम करताना आपल्या जीवनकार्याची दिशा सापडली. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’च्या कामात एक पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून स्वतःला झोकून दिले. श्याम मानव ह्यांच्याबरोबर १९८६ मध्ये ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची एक ट्रस्ट म्हणून …

विष्णुशास्त्री चिपळूणकर

इ.स.१८७५-७६ दरम्यान निबंधमालेतून विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांनी आपला दृष्टिकोण मांडला आहे. त्यांनी वापरलेला अंधश्रद्धेसाठीचा पर्यायी शब्द ‘लोकभ्रम’ हा अधिक वादातीत वाटतो. त्यांची ह्याबाबतची भूमिकासुद्धा आक्रमक, ब्राह्मणद्वेषी अथवा धर्मावर आगपाखड करणारी नाही. भूत नाहीच असे ठामपणे म्हणण्याऐवजी ते म्हणतात, ‘सृष्टीतील अद्भुत चमत्कार पहायची ओढ सर्वसामान्य माणसाप्रमाणे आम्हाला पण आहे. ह्या विषयी आमची कुणी पक्की खात्री करून दिली …

र. धों. कर्वे

१८८२ साली सुधारक मधील ‘स्त्रीदास्यविमोचन’ ह्या अग्रलेखात आगरकर म्हणतात, ‘कालांतराने फाजील संतत्युत्पत्ती होऊ न देता स्त्री-पुरुषाचा संयोग होऊ देण्याची युक्ती काढता येईल. स्त्रियांच्या आरोग्यरक्षणाला आवश्यक म्हणून जी काय दोन तीन मुले ठरतील तेवढी तरुण वयात करून घेतली म्हणजे पुढे टांकसाळ बंद ठेवण्याचा उपाय शोधून काढण्याकडे वैद्यकशास्त्राचे मन लागले आहे. व या कामात त्यास लवकरच यश …

अब्राहम कोवूर

२० व्या शतकातील भारतातील विवेकवादी चळवळीचे पितामह म्हणून डॉ. अब्राहम कोवूर ह्यांचा उल्लेख करावा लागेल. अमोघ वक्तृत्व, वैज्ञानिक विचारसरणी, परखड टीका आणि चमत्काराची प्रात्यक्षिके ह्यामुळे त्यांची भाषणे गाजत. श्रोतृवर्गाचा त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळे. चमत्कार ही बाबाबुवांची केवळ हातचलाखी आहे हे ते दाखवीत आणि तथाकथित अध्यात्म आणि संघटित धर्मावर तुटून पडत. १९६० ते १९७० च्या दशकात …